Friday, July 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedदाताळा येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका..!...

दाताळा येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका..! शिवसेनेची सा. बां. विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला तात्काळ दुरुस्तीची मागणी

दाताळा येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका..!

शिवसेनेची सा. बां. विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला तात्काळ दुरुस्तीची मागणी 

AMC24 News 📰 🗞️ 

विशेष प्रतिनिधी.  चंद्रपूर

चंद्रपूर दि. ३१ जुलै :- चंद्रपूर शहरातील दाताळा येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलकडे जाणारा मुख्य मार्ग सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून संपूर्ण रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असतांना सततच्या पावसामुळे त्यात पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे दररोज या मार्गावरून जाणाऱ्या शेकडो विद्यार्थी, पालक, शिक्षक व नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची गंभीर बाब लक्षात घेवून शिवसेना चंद्रपूर तालुका प्रमुख तथा शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष दशरथ पारखी यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभाग क्र 1 चे कार्यकारी अभियंता पगारे व विभाग क्र 2 चे कार्यकारी अभियंता टांगले यांना निवेदनाद्वारे तात्काळ दुरुस्तीची मागणी केली.*

*पारखी यांनी केलेल्या प्रमुख मागण्या:*
*1. पोद्दार स्कूलकडे जाणाऱ्या मुख्य मार्गाची तात्काळ पाहणी करून अहवाल सादर करावा.*
*2. रस्त्यावरील सर्व जीवघेणे खड्डे ७ दिवसांच्या आत तात्पुरते बुजवून वाहतूक सुरळीत करावी.*
*3. निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.*
*4. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी या मार्गाचे दर्जेदार व टिकाऊ डांबरीकरण/काँक्रीटीकरण लवकरात लवकर करण्यात यावे.*. 

*विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याने या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन कार्यवाही न केल्यास शिवसेना स्टाईलने जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असून यावेळी युवाशक्ती ग्रामविकास संघटनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष योगेश मुऱ्हेकर व शिवसेना चंद्रपूर उप-तालुका प्रमुख विक्की महाजन ह्यांची उपस्थिती होती.*

AMC 24 News 📰 🗞️

मुख्य संपादक अरविंद चाहादे घुग्घुस

9405714165

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular