घुग्घुस लोखंडे पुलाचे काम रखडले; नागरिकांसह व्यापारी वर्ग संतप्त

घुग्घुस : घुग्घुस येथील लोखंडे पुलाचे काम गेल्या तीन ते चार वर्षांपासून रखडल्याने परिसरातील नागरिक आणि व्यापारी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. शास्त्रीनगर, बंगाली कॅम्प शिवनगर,नगर शालीकराम नगर इंदिरानगर नगर. कामगार वसाहत, गांधीनगर यांसह परिसरातील नागरिकांना दररोज ये-जा करताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

लोखंडे पुलाचे काम वेळेत पूर्ण न झाल्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा थेट परिणाम होत असून, व्यापारी भागातील व्यवसायालाही मोठा फटका बसत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. ग्राहकांची वर्दळ कमी झाल्याने अनेक व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे

गेल्या अनेक वर्षांपासून पुलाचे काम पूर्ण करण्याबाबत नागरिकांकडून सातत्याने मागणी केली जात आहे. मात्र, प्रत्यक्ष कामाला अपेक्षित वेग मिळत नसल्याने नागरिकांचा संयम आता संपत चालला आहे. “आश्वासन नको, प्रत्यक्ष काम पूर्ण करा,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे

विशेष म्हणजे, विविध राजकीय पक्षांकडून वेळोवेळी नागरिकांना आश्वासने दिली जात असली तरी रखडलेल्या पुलाच्या प्रश्नावर ठोस आणि कायमस्वरूपी तोडगा कधी निघणार, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. विकासकामांमध्ये राजकीय हस्तक्षेपापेक्षा नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देण्याची मागणी जोर धरत आहे.
लोखंडे पुलाचे काम नेमके कधी पूर्ण होणार? नागरिकांना आणखी किती दिवस त्रास सहन करावा लागणार? व्यापाऱ्यांचे झालेले नुकसान कोण भरून काढणार? या प्रश्नांची उत्तरे प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी जनतेसमोर देण्याची गरज निर्माण झाली आहे.

घुग्घुसच्या नागरिकांची आता एकच मागणी आहे—आश्वासनांची पुनरावृत्ती नको; लोखंडे पुलाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा.
AMC24 News 📰 🗞️
मुख्य संपादक
अरविंद चाहादे घुग्घुस 9405714165



