राजुरा आगाराच्या ताफ्यात ५ नव्या अत्याधुनिक एसटी बसेस दाखल.
आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते लोकार्पण!

AMC 24 News
राजुरा, दि. ०७. विशेष प्रतिनिधी
- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) राजुरा आगारास नव्याने उपलब्ध झालेल्या ५ अत्याधुनिक बसेसचा लोकार्पण सोहळा आज राजुरा बसस्थानक परिसरात उत्साहात पार पडला. आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते या बसेसचे लोकार्पण करण्यात आले. या नव्या बसेसमुळे राजुरा मतदारसंघातील ग्रामीण भागातील प्रवासी महिला, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर होणार आहे.
- राजुरा आगारातील बसेसची कमतरता ओळखून आमदार देवराव भोंगळे यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. याआधी २ फेब्रुवारी २०२५ रोजी आगाराला ५ बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या, तर आज पुन्हा नव्याने ५ अत्याधुनिक बसेस ताफ्यात दाखल झाल्या. आगामी काळात राजुरा आगारासाठी आणखी नव्या बसेस मिळवून दिल्या जातील, असा विश्वास आमदारांनी यावेळी व्यक्त केला.
- यावेळी परिसरातील बसस्थानकांच्या आधुनिकीकरणाची माहिती देताना आमदार भोंगळे म्हणाले की, राजुरा येथे अत्याधुनिक सुविधांनी युक्त बसस्थानकाचे बांधकाम सध्या सुरू आहे. तसेच गडचांदूर येथील बहुप्रतिक्षित बसस्थानकासाठी १० कोटी रुपये आणि गोंडपिपरी येथील बसस्थानकासाठी ५ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला असून कोरपना येथील नवीन बसस्थानकाच्या मंजुरीसाठीदेखील शासनस्तरावर सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू आहे.
- या सोहळ्यास एसटी महामंडळाचे प्र. विभागीय नियंत्रक छगन दिवसे, वाहतूक अधिकारी कन्हैया भोगे, राजुरा आगार वाहतूक नियंत्रक अंकित कामतवार, भाजपाचे राजुरा शहराध्यक्ष सुरेश रागीट, भाजपा नेते राधेश्याम अडाणीया, महामंत्री मिलिंद देशकर, मंगेश श्रीराम, नगरसेवक प्रफुल कावळे, भूपेश मेश्राम, विनोद नरेंदुलवार, महामंत्री हरिदास झाडे, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा माया धोटे, अरुणा गावत्रे, तेजस्विनी कावळे, योगिता भोयर, प्रदीप पाला, उमेश गोरे, सागर भटपल्लीवार, दिलीप वांढरे, सोमेश्वर आईटलावार, नरसिंग भूपेली, सय्यद शहजाद अली, छबीलाल नाईक, स्वप्नील पहानपटे, राकेश आदे, निखिल भोंगळे, वैभव पावडे, अमोल मोरे, महेंद्र बुरडकर, अभिजीत कोंडावार, रवींद्र आत्राम, बालाजी बिरासदार, महेश झाडे, श्रीकांत चिट्टलवार, विवेक राठोड यांच्यासह परिवहन महामंडळाचे कर्मचारी, भाजपा कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- AMC 24 News 🗞️ 📰
- मुख्य संपादक अरविंद चाहादे घुग्घुस
- 9405714165







