म्हातारदेवी साज्या मधीलतलाठी विवेक. खांडरे यांच्या. हुकूमशाही. वागणूकीमुळे. अतिवृष्टी मदती पासून शेतकरी वंचित.
AMC24 News ️
अरविंद चाहादे घुग्घुस
चंद्रपूर – चंद्रपूर तालुक्यातील म्हातारदेवी साज्या मधील तलाठी विवेक खांडरे शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदती पासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.तेव्हा तलाठी साहेब यांना अतिवृष्टी मदत सरसकट असतांना त्यांनी केवळ चांदूर मधील १८.०० एकर क्षेत्र दाखविले आहे.तसेच म्हातारदेवी क्षेत्रात केवळ ५.०० एकर क्षेत्र पाठविले आहे.तेव्हा जुलै ते सप्टेंबर या तीन महीन्यात पडलेल्या पावसामुळे केवळ इतक्याच शेतकऱ्यांनाचे नुकसान झाले आहे का? प्रश्न सामान्य शेतकऱ्यांना पडतो आहे.
तेव्हा सरपंच सौ. संध्या पाटील यांनी आपले पती रविंद्र पाटील व मुलगा सिद्धांत पाटील यांचे नाव यादी मध्ये टाकण्यासाठी विसरल्या नाहीत.तेव्हा मात्र बाकीच्या सर्व शेतकऱ्यांनाचा त्यांना विसर पडतो आहे.तेव्हा सरपंच पोलिस पाटील तलाठी यांनी शेतकऱ्यांचा अंत पाहू नये.येत्या आठदिवसात शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर सर्व ते शेतकरी ग्रामपंचायत समोर उपोषणाला बसल्या शिवाय राहणार असा इशारा शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात येत आहे.