वणीत मोठा धक्का : राज्य कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया यांचा शिंदे…
भाजपला वणीत मोठा धक्का : राज्य कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया यांचा शिंदे गटात प्रवेश…
AMC24 News ️
– मुख्य संपादक
अरविंद चाहादे. घुग्घुस
October 14, 2025.
भाजपला वणीत मोठा धक्का : राज्य कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया यांचा शिंदे गटात प्रवेश…
वणीच्या राजकीय वर्तुळात आज मोठा भूकंप घडला आहे. भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य आणि वणीतील ज्येष्ठ समाजसेवक विजय चोरडिया यांनी आज शिवसेना (बालासाहेब ठाकरे) शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला आहे. नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या मोठ्या घडामोडीमुळे भाजपला वणीत मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू आहे.
विजय चोरडिया यांचा पक्षप्रवेश कार्यक्रम राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, पालकमंत्री संजय राठोड, मंत्री गुलाबराव गावंडे, मंत्री संजय शिरसाठ यांच्या उपस्थितीत पार पडला. विजय चोरडिया यांच्या समवेत आशिष काळे, राहुल मुंजेकर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे.
याप्रसंगी शिवराज पेचे, अनिल ढगे आणि चंद्रकांत घुगुल यांचीही उपस्थिती होती.
विजय चोरडिया हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असून त्यांनी अनेक लोकोपयोगी उपक्रम, आरोग्य शिबिरे आणि सामाजिक कार्यांच्या माध्यमातून शहरात तसेच ग्रामीण भागात आपली मजबूत पकड निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला स्थानिक पातळीवर मोठा फायदा होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
9405714165