Tuesday, October 21, 2025
Google search engine
HomeUncategorizedराजुरा विधानसभा काँग्रेसची निवडणूकपूर्व आढावा बैठक संपन्न : भुपेश मेश्राम आणि मित्रपरिवारांचा...

राजुरा विधानसभा काँग्रेसची निवडणूकपूर्व आढावा बैठक संपन्न : भुपेश मेश्राम आणि मित्रपरिवारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश.

 

राजुरा विधानसभा काँग्रेसची निवडणूकपूर्व आढावा बैठक संपन्न : भुपेश मेश्राम आणि मित्रपरिवारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश.

 

जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे व प्रभारी हैदर अली दोसानी यांचे मार्गदर्शन

विशेष प्रतिनिधी. राजुरा.

AMC24 News ️

मुख्य संपादक.

अरविंद चाहादे     9405714165

राजुरा (ता.प्र.) :– येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची रणनीती, संघटनशक्ती आणि मतदारांशी संवाद वाढविण्याच्या दृष्टीने काँग्रेस कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली. ही बैठक चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या अध्यक्षतेखाली तर राजुरा विधानसभा प्रभारी हैदर अली दोसानी यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज संकुल राजुरा येथे दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आली होती. यावेळी भुपेश मेश्राम, सुधीर मेश्राम, विवेक राठोड, रवीनारायण यादव, आवेश बेग यासह भुपेश मेश्राम यांचे मित्र परिवारातील सदस्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सर्वांना काँग्रेस पक्षाचे दुपट्टे देऊन जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे, विधानसभा निरिक्षक हैदर अली दोसानी यांनी काँग्रेसमध्ये स्वागत केले.
बैठकीत जिल्हाध्यक्ष धोटे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले की, काँग्रेस पक्ष हा जनतेच्या मनात रुजलेला पक्ष आहे. येणाऱ्या निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्त्याने लोकांपर्यंत पक्षाची विचारधारा, कामगिरी आणि जनकल्याणकारी भूमिका पोहोचवावी. संघटन मजबूत असेल तर विजय आपोआप निश्चित होतो, असे प्रतिपादन त्यांनी केले. ते पुढे म्हणाले की, विधानसभेत मत चोरी व याद्यांमधील घोळ यामुळेच आपला पराभव झाला असून त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी मत चोरी ला आळा घालणे, याद्यांमध्ये असलेला घोळ, मतदार नागरिकांशी संवाद अशा सर्व बाबींवर जागृत राहून काम करण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन केले. तर राजुरा विधानसभा प्रभारी हैदर अली दोसानी यांनी कार्यकर्त्यांना उत्साहाने काम करण्याचे आवाहन करत म्हटले की, आगामी निवडणुका ही केवळ सत्ता परिवर्तनाची नव्हे तर जनतेच्या विश्वास पुनर्स्थापनेची संधी आहे. प्रत्येक बूथ स्तरावर काँग्रेसची उपस्थिती ठळक व्हावी, यासाठी एकदिलाने काम करणे गरजेचे आहे असे त्यांनी नमूद केले.
यावेळी राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, सभापती विकास देवाळकर, महिला तालुकाध्यक्ष निर्मला कुडमेथे, शहराध्यक्ष हरजीतसिंग संधू, जिल्हा महासचिव एजाज अहमद, माजी जि. प. सदस्य नानाजी आदे, ओबीसी काँग्रेसचे नंदकिशोर वाढई, आदिवासी नेते श्यामराव कोटणाके, जंगू एडमे, कृ. उ. बा. स. संचालक उमाकांत धांडे, संतोष इंदूरवार, विनोद झाडे, जगदीश बुटले, अनुसूचित जाती विभाग काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कोमल फुसाटे, महिला काँग्रेस शहराध्यक्षा संध्याताई चांदेकर, माजी नगरसेवक प्रभाकर येरणे, आनंद दासरी, गजानन भटारकर, दिपा करमनकर, अशोकराव देशपांडे, पंढरी चन्ने, माजी सभापती कुंदाताई जेनेकर, उपसभापती अब्दुल जमीर, प. स. सदस्य तुकाराम माणूसमारे, सरपंच निलकंठ खेडेकर, शंकर गोनेलवार, अँड. मधुकर कोटनाके, अँड. रामभाऊ देवईकर, सुरेश पावडे, रामभाऊ ढुमणे, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष उमेश गोणेलवार, तालुकाध्यक्ष इर्शाद शेख, मंगेश गुरनुले, कविता उपरे, पुणम गिरसावळे, इंदूबाई निकोडे, सुमित्राबाई कुचनकर, संगीता गेडाम, चेतन जयपूर, सय्यद साबिर, संदीप नन्नवरे, दिपक झाडे यासह राजुरा काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष रंजन लांडे यांनी केले. संचालन जिल्हा महासचिव एजाज अहमद यांनी तर आभार प्रदर्शन विधानसभा अध्यक्ष उमेश गोणेलवार यांनी केले.

प्रसिद्धी प्रमुख
राजुरा विधानसभा काँग्रेस.     

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular