– घरासमोरील स्कुटी बाजूला केल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर चाकू हल्ल्यात झाले. या हल्ल्यात एक जन ठार, तर पाच जन जखमी झाल्याची घटना रविवारी मूल येथे रात्रौ 10:30वाजता घडली. प्रेम चरण कामडे (वय 17) असे मृताकाचे नाव आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेनी सात आरोपीना अटक केली आहे.
मूल येथील बबन मारोती कामडे व त्यांचा चुलत भाऊ नरेंद्र कामडे हे शेजारीच राहतात. रविवारी रात्रौच्या सुमारास दुचाकी स्कुटी बाजूला केल्याच्या वादावरून भांडण झाले.चरण कामडे यांचेवर चाकू हल्ला करण्यात आला. वडिलांस वाचवीण्यासाठी प्रेम कामडे आडवा गेला असता त्याचेवर चाकू हल्ला करण्यात आला. यावेळी प्रेम ला चाकू लागल्याने त्याचा चंद्रपूर ला नेतांना वाटेतच मृत्यू झाला. तर अविनाश कामडे, चरण कामडे व इतर तीन जन जखमी आहेत. नागरिकांनी या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस स्टेशन गाठून आरोपीना अटक करण्याची मागणी केली. यावरून मूल पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सातही आरोपीना अटक केली. आरोपीनी वापरलेले वाहन व चाकू जप्त केले आहे. आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मा. मुम्मका सुदर्शन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी भगत साहेब यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक परतेकी व त्यांची चमू आणि स्थानिक गुन्हे शाखा पुढील तपास करीत आहे.



